---Advertisement---
भुसावळ

हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२३ । मागील काही दिवसापासून तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला आहे. यामुळे हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे धरणातून टप्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जात असून गुरुवारी सायंकाळी ७ वाजेल हतनूर धरणाचे २४ दरवाजे १.५० मीटरने उघडण्यात आले आहे.

hatnur dam jpg webp

त्यातून ७५,५४३.०० क्यूसेस एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून गुरेढोरे नदीच्या पात्रात सोडूनये व मनुष्यप्राणी यांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन केले आहे.

---Advertisement---

दरम्यान, जुलैचा पंधरवाडा लोटला तरीही राज्यातील धरणात अवघा ३० टक्केच जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणात सरासरी तब्बल १६ टक्के पाणीसाठा कमी आहे. मान्सून लांबल्याने आणि धरणक्षेत्रात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने राज्यातील धरणे केवळ ३० टक्केच भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्याची चिंता वाढवली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---