हतनुर धरणाचे 10 दरवाजे उघडले ; तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जुलै 13, 2023 2:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून यामुळे हतनूर धरणातील जलसाठ्यात वाढ होत आहे. सद्य स्थितीत हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहे.

hatnur dam

हतनुर धरणात येणाऱ्या येव्यानुसार टप्प्या टप्प्याने हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. आज गुरुवारी हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडे असून 560.00 घ.मी.प्र.से. /19779 cusec एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. हतनूर धरणा खालील ग्रामस्थांना सुचित करण्यात येते की, कोणीही तापी नदी पात्रात जाऊ नये, तसेच गुरेढोरे नदीच्या पात्रात सोडूनये व मनुष्यप्राणी यांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच आवश्यक खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now