“सागरा प्राण तळमळला” नाट्याचे जळगाव शहरात विनामुल्य आयोजन !

जुलै 11, 2023 4:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या वतीने जळगाव शहरात श्री श्री बालाजी निर्मित मधुसूदन कालेलकर लिखीत हिंदुतेजसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित नाटक “सागरा प्राण तळमळला” या नाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

sagara pran talmalala natak jpg webp

दिनांक १६ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव येथे विनामुल्य आयोजन करण्यात आले आहे.

तरी जळगाव शहरातील सर्व सावरकर प्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित या नाट्याला उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे (राजुमामा), भाजपा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now