जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला जब्बर धक्का : शिवसेनेत मोठी इनकमिंग !
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ । आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारसंघातील कजगाव आणि भोरटेक येथील युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. आमदार किशोर पाटील यांच्या कामांनी प्रभावित भडगाव तालुक्यातील कजगाव, भोरटेक येथील असंख्य तरुणांनी काल दुपारी आमदारांच्या शिवालय या संपर्क कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी पक्षाचा भगवा रुमाल टाकून आमदार किशोर पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कजगाव येथील सरपंच पुत्र अनिल रघुनाथ महाजन, माजी विधानसभा प्रमुख अविनाश कुडे, प्रविण ब्राम्हणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भोरटेक येथील चेतन शितोळे, राहुल महाजन, आकाश पाटील, वरुज पाटील, शुभम महाजन, निलेश धनगर, प्रेम देशमुख, बंटी देशमुख, रवींद्र शितोळे, नंदू महाजन, अजय पाटील, अमोल पाटील, समाधान महाजन, ज्ञानेश्वर महाजन, कैलास महाजन तर कजगाव येथील सुरेश मोरे,
कैलास वाघ, मच्छिंद्र मोरे, राजेंद्र सोनवणे, सुनील शिंदे, राकेश मोरे, तेजस साळुंखे समाधान अहिरे, रवींद्र मोरे, किसन सोनवणे आदी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार योगेश जाधव यांनी मानले. आगामी काळात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वातच आपण गाव विकासाची कामे करणार असल्याचा मनोदय तरुणांनी बोलून दाखविला. तर, आमदार किशोर पाटील यांनी उपस्थितांचे पक्षात स्वागत केले.