⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 6, 2024
Home | जळगाव जिल्हा | ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्याने जळगावकर घामाघूम; या तारखेनंतर परतीचा पाऊस बरसणार?

‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्याने जळगावकर घामाघूम; या तारखेनंतर परतीचा पाऊस बरसणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२४ । सध्या जळगावसह राज्यभरात पावसाने उसंत घेतल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. गुरुवारी जळगावचा पारा ३५ अंशांवर पोहोचला होता. एकीकडे तापमानात वाढ होत असताना, दुसरीकडे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे जळगावकर उकाड्याने बेहाल झाले.

जळगावकरांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू असल्याने काही दिवसांतच मान्सून राज्यासह देशातून परतण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचा अंदाज आहे.

त्याची सुरुवात महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच झाली असून, जळगावचा पारा ३५ अंशांवर पोहोचला होता. पहिल्याच आठवड्यात जर जबरदस्त उकाड्याने नागरिक बेहाल झाले असतील तर अजून महिनाभरात ‘ऑक्टोबर हीट’ अधिक जाणवणार असून, पहाटेचा गारवा कमी राहण्याची शक्यता आहे.

राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज :
दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ६ ते ९ ऑक्टोंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात देखील विजांच्या कडकटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात १२६ टक्के पाऊस झाला आहे. तर या ऑक्टोंबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यंदा मान्सूनचा परत जाण्याचा प्रवास लांबला आहे. संपूर्ण राज्यातून मान्सून परत जाण्यासाठी १० ऑक्टोंबर उजाडेल, असा अंदाज आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.