गुन्हे

वनविभागाच्या कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुन २०२३ । चोरवड नाक्यावर विना परवाना जळावू लाकडाची तस्करी होत असताना वनविभागाने मोठी कारवाई केलि आहे. यावेळी 18 हजारांच्या लाकडासह पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चालक शे.तनवीर शे.निसार (32, रा.चोपडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवरील चोरवड नाक्यावर मंगळवारी पहाटे अडीच वाजता ट्रक (क्र. एम.एच.18 बी.जी.8167) आल्यानंतर ट्रक चालकाला पासबाबत विचारणा केली. त्याच्याकडे तो आढळला नाही. शिवाय ट्रकमध्ये जळावू लाकडाची विनापरवाना वाहतूक होत असल्याने वनविभागाने ट्रक जप्त करीत चालक शे.तन्वीर शे.निसार यास ताब्यात घैतले.

पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक व 17 हजार 80 रुपयाचे पंचरास जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले. संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, रावेर वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरवड तपासणी नाक्यावरील वनरक्षक र.अ.भुतेकर, गोविंदा मराठे राजू तडवी आदींच्या पथकाने केली.

Related Articles

Back to top button