कारच्या धडकेत रिक्षातील प्रवाशी जखमी,गुन्हा दाखल

एप्रिल 6, 2022 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। ६ एप्रिल २०२२ । येथील नशिराबाद महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षातील प्रवाशी जखमी झाल्याची घटना ३० मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी कार चालकाविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident 6

अधिक असे की, शेख सईद शेख मजीद (५६, रा. नशिराबाद) हे मजूरी करून उदरनिर्वाह करतात. ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जळगावून नशिराबाद येथे येणासाठी ते रिक्षात बसले होते. तरसोद फाट्याजवळील टोयोटा शोरूम जवळील राष्ट्रीय महामार्गावरून रिक्षाने जात असतांना. त्यांच्या रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १५ ईए १७८६) ने जोरदार धडक दिली. या घटनेत शेख सईद यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

उपचार घेतल्यानंतर शेख सईद शेख मजीद यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार ५ एप्रिल रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात(एमएच १५ ईए १७८६) वरील कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now