⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना ! वसतीगृहातील ‘केअरटेकर’चा पाच मुलींसोबत घाणेरडा प्रकार

जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना ! वसतीगृहातील ‘केअरटेकर’चा पाच मुलींसोबत घाणेरडा प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अशातच जळगाव जिल्ह्याला हादरवून सोडणारा प्रकार उघडकीस आला आहे.

एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींच्या वस्तीगृहातील तब्बल पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे वसतीगृहाचा केअरटेकर म्हणून काम करणार्‍या इसमानेच हे घृणास्पद कृत्य केले असून त्याला हॉस्टेलची अधिक्षका आणि सचिवाने सहकार्य केले. हे कृत्य करत असतांना संस्थेच्या अधिक्षका आणि सचिवांना माहिती देऊन देखील त्यांनी काहीही कार्यवाही न करता गणेश पंडितला सहकार्यच केले.ऑगस्ट 2022 ते जून 2023 अशा मागील दहा महिन्यांपासून हा घाणेरडा प्रकार सुरु होता.

यामुळे त्याच्यासह आरोपीचीच पत्नी असलेल्या अरूणा गणेश पंडित आणि संस्थेचा सचिव भिवाजी दीपचंद पाटील या तिघांच्या विरोधात एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसतीगृहाचा केअरटेकरच सैतान बनल्याचा धक्कादायक प्रकार यातून उघड झाला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.