जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ । जर तुम्हीही आयफोन (iPhone) खरेदी करण्याची इच्छा असेल आणि बजेटमुळे घेता येत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आयफोन 15 ची सीरिज (iPhone 15 Series) लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. त्यासाठी युजर्स खूपच उत्सुक आहेत.आयफोन 15 लॉन्च होण्यापूर्वीच आयफोन 14 च्या किमती (iPhone 14 Price) घसरल्या आहेत.
जवळपास 80 हजारांचा आयफोन 14 तुम्ही फक्त 35 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करु शकणार आहात. इतक्या स्वस्त किमतीत तुम्ही आयफोन 14 कुठे आणि कसा खरेदी करु शकता हे आज आपण जाणून घेणार आहोत…
स्वस्तात करा खरेदी –
आयफोन 14 ची लॉन्चिंग किंमत 79,900 रुपये आहे. परंतु तो फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हे फ्लिपकार्टवर 11% च्या सूटसह 70,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजेच, या आयफोनवर संपूर्ण 8,901 रुपये ऑफ मिळत आहेत. यानंतर, अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत. ज्यामुळे हा आयफोन कमी किंमतीत मिळू शकतो.
बँक ऑफर –
जर तुम्ही आयफोन 14 खरेदी करण्यासाठी एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 4 हजार रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 66,999 रुपये होईल. त्यानंतर एक्सचेंज ऑफर देखील तुम्हाला मिळू शकते.
आयफोन 14 एक्सचेंज ऑफर –
आयफोन 14 वर 33 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. जर तुम्ही तुमचा जुना आयफोन बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळेल. परंतु 33 हजारांची संपूर्ण सूट तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल. जर तुम्ही पूर्ण ऑफ मिळवण्यात यशस्वी झालात तर या आयफोनची किंमत 33,999 रुपये असेल.