जळगाव जिल्ह्यावर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज ; मुंबईत बैठक !
जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ मे २०२३ | वर्षभरात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार हे नक्की झाले आहे. र्पयायी र्सवच पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील तयारी सुरू केली. मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या जागांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थीत राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या जागांवर आपला दावा केला आहे. दुसरीकडे काँग्रेसने देखील रावेर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून दोन्ही काँग्रेसमध्ये बिनसण्याची शक्यता आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. सतीश पाटील, विकास पवार, दिलीप वाघ यांच्यासह अनेक जण राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात मनीष जैन, रवींद्र पाटील हे इच्छुक आहेत.