⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | संपूर्ण देशाला वेड लावणार ‘गुलाबी साडी..’ फेम संजू राठोड आहे जळगावकर; वाचा सविस्तर

संपूर्ण देशाला वेड लावणार ‘गुलाबी साडी..’ फेम संजू राठोड आहे जळगावकर; वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ मे २०२४ | सध्या अहिराणीसह मराठी गाण्यांची क्रेझ इतकी वाढलीय की लग्न, वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमांसह अगदी थेट शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. यातच गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ…या मराठी गाण्याने तर सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. विशेष या गाण्याचा लेखक आणि गायक हा जळगावकर आहे.

हे गाणं नवोदित गायक संजू राठोड यांनी गायलं असून गाण्याचे बोल देखील त्याचेच आहे. सर्वांनी डोक्यावर घेतलेला संजू राठोड हा तरुण जळगाव जिल्ह्यातील धानवड तांड्याचा आहे. या गाण्यात कलावंत म्हणून संजू राठोड आणि प्राचुर घुर्डे यांनी काम केलं. ६ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत (७ मे) यूट्यूबवर ९ कोटी ८१ लाख ९८ हजाराहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

विशेष या गाण्याने बॉलीवूड व साऊथच्या मोठ्या चित्रपटांच्या गाण्यांना धोबीपछाड दिली. तरुण-तरुणी या गाण्यावर शॉर्ट व्हिडीओ तसेच इन्स्टाग्राम रिल्स मोठ्या उत्साहात बनवत आहेत. तसेच लग्न समारंभ आणि आनंदाच्या क्षणी देखील हे गाणे वाजताना दिसत आहे.

गाणं :
काजळ लावुनी आले मी आज असं नका बघु अहो येते मला लाज… केला श्रृंगार आज घातलया साज दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास…
अए नखरे वाली कुठे निघाली
घालुनी साडी लाल गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल…

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड….
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड….

झाला close आता wide मान वरती okay right
फोटो काढतो असा होनार ज्याने वातावरण टाइट…
मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाइट माझा
होऊदे पगार गिफ्ट करतो रिंग लाइट…
नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन
सेलिब्रिटी तू मी तुझा P.A बनुन राहिन…
येणार सेल्फी साठी क्राउड मला फील होणारं प्राउड जाशील Insta वर लाइव अन मी कमेंट करत पाहिन…
करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट
राजा होनार मी Insta ची स्टार…
हाय्ये य्ये य्ये
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड….
किती मी क्यूट किती गोड किती छान
दिसते मी भारी राजा फोटो माझा काड….

अदा माझी सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन…

थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन…
अय्ये माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज भी बोल्लेलो किस्मी ती बोल्ली आज नाय बनू नको म्हणे इम्रान हाश्मी…

माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कार विथ चांदीच कंगण सोन्याचा गंठन करीन गिफ्ट हा नाय करत मजाक मी …

पुरी करीन तुझी हर एक wish
नको करू शंका ना सवाल…

हाय…
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड….
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काड…

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.