जळगावकरांनो सावधान! उष्माघातामुळे उपसरपंचाचा दुर्दैवी मृत्यू

मे 21, 2023 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत चालला असून परिणामी उष्माघाताचे बळी वाढत आहे. जळगावमध्ये उष्माघातामुळे आणखी एकाचा बळी गेला आहे.

kamalakar patil jpg webp

जळगाव तालुक्यातील वावडदा येथील उपसरपंच तथा माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन कमलाकर आत्माराम पाटील यांचा उष्माघाताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील उपसरपंच यांचा मृत्यू झाल्याने शनिवारी गावातील सर्व दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.

मुक्ताईनगरातील मन सुन्न करणारी घटना! काय आहे वाचा

कमलाकर पाटील यांचे वावडदा शिवारात शेत असून रात्री बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतातील कामे दिवसा करावी लागतात. या अनुषंगाने कमलाकर पाटील आणि त्यांच्या घरातील महिला यांनी दिवसभर काम केले. प्रचंड उन्हामुळे सायंकाळी त्रास व्हायला लागला. सुरुवातीला त्यांना लिंबू पाणी देऊन उपचार केले. त्यानंतर त्यांना जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. कमलाकर पाटील हे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत उपसरपंच होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now