जळगावात अपात्रतेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जोडले हाथ !

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । शिवसेनेतील १६ आमदरांना अपात्र करण्यात यावे अशी याचिका दाखल करण्यात आली आहे.यावर कधीही निकाल लागण्याची शक्यता आहे. अश्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात आलेले असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला

eknath shinde 2 jpg webp

१६ आमदरांना अपात्र करण्याच्या त्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झालेली आहे. आता लवकरच म्हणजे उद्या निकाल लागेल असे म्हटले जात आहे. अश्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावात आलेले असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हात जोडून शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावला आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कन्या डॉ.अमृता यांच्या विवाह सोहळ्यासाठी आले होते. तेथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी होणाऱ्या सत्तासंघर्षावरील निकालाबाबत प्रश्न विचारला. हात जोडून ‘तुम्हा सर्वांना शुभेच्छा!’ म्हणत मुख्यमंत्री जळगाव विमानतळाकडे रवाना झाले.

यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री दादा भुसे, सुधीर मुनगंट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now