Dharangaon.. अन् बस अचानक खड्ड्यात अडकली, प्रवासी थोडक्यात बचावले

मे 5, 2023 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२३ । जिल्ह्यातील रस्त्ये अपघाताचे प्रमाण आधीच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात अनेक शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने अपघातांना आमंत्रण दिले जात आहे. दरम्यान अशातच धरणगाव शहरातील लहान माळी वाडा परिसरात प्रवाशांनी भरलेली बस अचानक खड्ड्यात अडकली. सुदैवाने वेग कमी असल्यामुळे बस पलटी झाली नाही. यामुळे प्रवासी बचावले आहेत.

dharangaon bus jpg webp

नेमका प्रकार काय?
मरिमाता परिसराकडून पाईप लाईनचे काम सुरु असल्यामुळे धरणगावहून सोनवद जाणारी बस (क्र.एम.एच ०६ एस.८६२५) आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास माळी वाडा परिसरातून तेली तालावाकडून संजय नगरमार्गे जात होती. परंतू रमेश पाटील यांच्या घराजवळ अचानक बस खड्ड्यात अडकली. अचानक झालेल्या प्रकारामुळे प्रवाशी घाबरले होते. सुदैवाने वेग कमी असल्यामुळे बस पलटी झाली नाही.

यामुळे प्रवासी बचावले आहेत.बसमध्ये ४० ते ५० प्रवाशी होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा बसला बाहेर काढण्याचे काम सुरु होते. यावेळी गोपाल चौधरी,रवींद्र निकम,राहुल चौधरी,बापु चौधरी,अविनाश चौधरी,नीलेश न्हावी, भुऱ्या पाटील, कृष्णा न्हावी यांनी मदतकार्य केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now