Jalgaon ! लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाचा टोकाचा निर्णय, आई-वडीलांना बसला धक्का..

एप्रिल 9, 2023 12:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून एका ३३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील ममुराबादमध्ये उघडकीस आलीय. जगदीश लक्ष्मण पाटील (वय ३३) असं मयत तरुणाचे नाव असून एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पाटील कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

mamurabad jpg webp

याबाबत अधिक असे की, जगदीश लक्ष्मण पाटील हा ममुराबाद येथे आई – वडीलांसह वास्तव्यास होता. जगदीश पाटील हा तरुण जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी जगदीश हा कामवार गेला नाही. त्याचे आई वडील दोघेही कामानिमित्ताने घराबाहेर गेल्याने जगदीश हा घरी हा एकटाच होता. यादरम्यान त्याने त्याने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

गळफास घेतलेल्या अवस्थेत जगदीशला पाहून आई – वडीलांना धक्काच बसला आणि त्यांनी हंबरडा फोडला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पाटील कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जगदीश याचे काका यांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जगदीश याचे लग्न होत नसल्याने तो तणावात होता. याच कारणामुळे तो दारु पित होता. लग्नाच्या विचारातूनच जगदीश याने आत्महत्या केल्याचे जगदीशच्या काकांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now