संजय राऊत यांनी दर्शवली गिरीश महाजन यांच्या मताशी सहमती

एप्रिल 1, 2023 1:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२३ । गिरीश महाजन यांनी दंगलीबाबत केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या मताशी सहमत असल्याचे विधान केले.

sanjay rau and girish mahajan jpg webp

यावेळी ते म्हणाले कि, गिरीश महाजन हे अगदी बरोबर बोलत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीवरून काही जणांना राजकारण करायचे आहे. राज्यातील जनतेचा विद्यमान सरकारला सुरू असलेला विरोध पाहूनच हे प्रकार सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कालच राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तथा क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला होता. सदर दंगल ही जाणीवपूर्वक घडून आणलेली दिसून येत आहे. काही जणांना त्यांची व्होट बँक तयार करावयाची आहे, त्याचप्रमाणे ती टिकवायची आहे. त्याकरिता जाणीवपूर्वक अशा प्रकारे कृत्य घडवले गेले आहे. याअनुषंगाने तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now