जळगाव लाईव्ह न्यूज | २३ मार्च २०२३ | जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू सुरू झाली आहे. यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये आढावा घेण्यासाठी बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात आगामी निवडणुकांचे नारळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून फुठणार आहे. कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वातंत्र्य लढायचे की भाजपासोबत युती करायची याबाबत मंथन करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वतंत्र लढण्याबाबतचा सूर पाहायला मिळाला. ग्रामीण भागात सर्वाधिक ग्रामपंचायत व विकास सोसायटी या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. स्वतंत्र लढ्यास कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेच्या पदरात नक्कीच जास्त यश येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून , शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा उपतालुका प्रमुख नाना सोनवणे,उपाध्यक्ष माजी सभापती कैलास चौधरी, नंदू पाटील, डॉ कमलाकर पाटील,अनिल मोरे, पंकज पाटील, जितेंद्र पाटील, सुरेश पाटील नांद्रा, मुरलीधर पाटील, शांताराम सोनवणे, बापू महाजन,दिलीप अगिवाल, दगडु चौधरी, जितू अत्रे, वसंत भालेराव, सचिन पाटिल चंद्रशेखर पाटील रमेश जळकेकर पि.के पाटील अर्जुन पाटील यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.