ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदाराला 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा

मार्च 8, 2023 2:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देणाऱ्या आमदाराला न्यायालायने दणका दिला आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे.

court 1 1 jpg webp

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
2017मध्ये बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. महापालिकेत हे आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. त्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं.

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी 2 वर्षांची शिक्षा बच्चू कडू यांना ठोठावण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now