गुलाबराव पाटील म्हणाले, होय मी गद्दारी केली, कारण…

फेब्रुवारी 25, 2023 11:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : २५ फेब्रुवारी २०२३ : उध्दव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विरोधकांकडून गद्दाराची उपमा दिली जाते. याविषयावर शिवसेना नेते तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोकठोक भाष्य करत विरोधकांच्या आरोपांमधून हवा काढली आहे. गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं गुलाबराव पाटील जळगावात एका कार्यक्रमात म्हणाले.

gulabrao patil jpg webp

जळगावातील बिलखेडा गावात विविध विकासकामं आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी पाटील यांनी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपावर थेट प्रतिहल्ला चढविला. विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचं नाही. बिलखेडेत साधी एक मुतारी हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, असा जोरदार हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.

तुम्ही काय आमच्यावर टीका करता. शरद पवार म्हणतात एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now