सोन्याने गाठला आतापर्यंतचा विक्रमी उच्चांकी दर ; खरेदीपूर्वी आजचा भाव तपासून घ्या..

फेब्रुवारी 3, 2023 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । अर्थसंकल्पानंतर भारतीय सराफ बाजारात सोन्याने विक्रमी उच्चांकी दर गाठला आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आज सोने 0.33 टक्क्यांनी वाढले आहे. तर चांदी 0.16 टक्क्यांनी महागली आहे. Gold Silver Rate Today

gold silver 1 jpg webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा सोने-चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 190 रुपयांनी वाढला. त्यामुळे सोने 57,885 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. सोबतच एमसीएक्सवर चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज चांदी 110 रुपयांनी वाधरली आहे. त्यामुळे चांदी 70,315 रुपये प्रति किलोने व्यवहार करत आहे.

काय आहेत जळगावात आजचा भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीने विक्रमी नवीन उच्चांक गाठला आहे. सध्या जळगावात 22 कॅरेट सोन्याचा जवळपास 54000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा जवळपास 58,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. चांदी प्रति किलो 71,500 हजार रुपयावर गेली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

जळगावमध्ये सोन्याच्या किमती इतक्या आधी कधीच पोहोचल्या नव्हत्या. सोन्याच्या किमतीत एवढी मोठी झेप घेतल्याने लग्नाच्या खरेदीसाठी येणाऱ्या लोकांच्या खिशावर मोठा ताण पडणार आहे. सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लोक सोने-चांदीची खरेदी जोरात करत आहेत.

सोन्याबाबत सरकारने नियम बदलले

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अर्थसंकल्पात सोन्याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. आता जर तुम्ही घरात ठेवलेले सोने विकून इलेक्ट्रॉनिक गोल्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे डिजिटल सोने विकून प्रत्यक्ष सोने खरेदी केल्यावरही भांडवली नफा भरावा लागणार नाही. याचा अर्थ असा की जर तुम्ही सोन्याचे दागिने विकून डिजिटल सोने खरेदी केले तर तुम्हाला त्यातून मिळणाऱ्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now