खुशखबर.! आज सोन्याचा दर घसरला, मात्र चांदी महागली ; वाचा प्रति तोळ्याचा दर?

जानेवारी 27, 2023 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२३ । तुम्ही जर आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज बाजारातील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 0.40 टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे चांदीचा दर 0.20 टक्क्यांनी वाढला आहे. Gold Silver Rate Today

gold jpg webp

MCX काय आहे आजचा सोन्याचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) आज सकाळी 24 कॅरेट सोन्याची किंमत किंचित 226 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,736 रुपायांवर व्यवहार करत आहे.

चांदी महागली ?
आज चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. आज चांदीची किंमत 140 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे चांदी 68,814 रुपये प्रति किलोवर गेली आहे.

जळगावातील दर :
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,500 रुपयावर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,300 रुपायपर्यंत आहे. एक किलो चांदीचा भाव 68,500 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now