जळगावच्या ऑटो डिलरशिपला लागला साडेतीन लाखाचा ऑनलाइन चुना

जानेवारी 24, 2023 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२३ । ऑनलाईन फसवणूक होणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येतेय. अशातच मोबाईलवर लिंक पाठवून प्ले-स्टोअरमधून आयएसएल ॲप डाऊनलोड करायला सांगून सायबर ठगाने ऑटो डिलरशिपचे काम करणा-या प्रौढाला साडेतीन लाखाचा ऑनलाइन चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रौढाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात सायबर चोरट्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

state bank fraud of rs 1 5 crore crime against 17 persons including bank valuers jpg webp

रिझवान अली लियाकत अली सैय्यद हे नशेमन कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ई-कार्ड लॉजिस्टीक या कंपनीकडून ऑनलाइन शेविंग प्रोडक्ट मागविले होते. खराब प्रोडक्ट मिळाल्यामुळे रविवारी दुपारी ४ वाजता त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क साधला. त्यावेळी त्यांना कंपनीकडून फोन येईल, तेव्हा तक्रार करा सांगण्यात आले. काही वेळानंतर रिझवान अली यांना एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला.

संबंधित व्यक्तीने रिझवान यांना लिंक पाठवून प्ले-स्टोअरमधून आयएसएल ॲप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर तीन तासानंतर त्यांच्या खात्यातून ५० हजार रूपयांचे सात ट्रान्झॅक्शन झाल्याचा एसएमएस त्यांना प्राप्त झाला. त्यावेळी त्यांना लक्षात आले की आपली फसवणूक झाली. अखेर सोमवारी प्रौढाने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार साडेतीन लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now