वाणिज्य

मकर संक्रांतीपूर्वी चांदी झाली स्वस्त, मात्र सोने पुन्हा महागले ; घ्या जाणून आजचा नवीन दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । मागील काही दिवसापासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत असल्याचे दिसून येतेय. साेन्यासाेबतच चांदीच्या दरातही‎ माेठी तेजी आलेली आहे. दरम्यान, आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीच्या दरात घसरण झालेली दिसून येतेय. मात्र सोने पुन्हा महागले आहे. त्यामुळे सोन्याचा दर पुन्हा 56 हजाराच्या उंबरवठ्यावर पोहोचला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याची किंमत 52 रुपयांनी वाढली आहे. तर दुसरीकडे चांदी 200 रुपयांनी घसरली आहे. Gold Silver Rate Today

काय आहे आजचा भाव?

MCX वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर 52 रुपयांनी वाढून 55,933 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज चांदी 200 रुपयांनी घसरली असून 68,441 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे

राज्यातले सोने-चांदीचे भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 56.070 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,400 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,070 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 51,400 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,070 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 51,430 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 56,100 रुपये आहे. जळगावमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 51,660 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 56,400 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 719 रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button