⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | तिबेटी लोक 35 वर्षांपासून जळगावात विकतायेत गरम कपडे; हे आहे कारण

तिबेटी लोक 35 वर्षांपासून जळगावात विकतायेत गरम कपडे; हे आहे कारण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | चिन्मय जगताप | जळगाव शहरातील जीएस ग्राउंड या ठिकाणी दरवर्षी हिवाळ्यामध्ये तिब्बत हून येऊन नागरीक गरम कपडे विकतात हे आता संपूर्ण शहराला माहित आहे. जळगाव शहरातील नागरीकहि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गरम कपडे विकत घेतात. मात्र ते इथे येण्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का? यामागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. 1962 झाली झालेल्या भारत चीन युद्धाची याला पार्श्वभूमी आहे. (tibet fair in jalgoan)

1962 मध्ये झालेल्या भारत-चायना युद्धात तिब्बतचा प्रांत चीनने भारताकडून हिसकावून घेतला आणि असंख्य तिब्बती नागरिक अक्षरशः निर्वासित झाले. त्यानंतर हेच तिब्बत लोक अश्रित म्हणून राहू लागले. आजही या लोकांना पुन्हा तिबेट मध्ये जायचं आहे. चीनच्या हुकूमशाही विचारधारेमुळे तिब्बतींना पुन्हा आपल्या मातृभूमीत जाता येत नाहीये. मात्र या सर्व काळात आपली उपजीविका सांभाळण्यासाठी आपलं कुटुंब वाचवण्यासाठी हेच तिब्बती लोक संपूर्ण भारतात जातात आणि आपली खासियत असलेले गरम कपडे विकतात. जळगाव शहरातील जीएस ग्राउंड वर गेल्या 35 वर्षापासून हे लोक गरम कपडे विकत आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत अशी तीन महिने हे लोक इथं येतात आणि जळगावकरांना गरम कपडे विकतात.


त्यात अजून एक बाब म्हणजे 62 च्या युद्धानंतर काही तिबेटचे काही लोक भारतात तर काही लोक चीनमध्ये जाऊन बसले. मात्र भारत चीन सीमा वादामुळे या लोकांना एकमेकांना भेटता येत नाही. लपून छपून या ठिकाणी यायचा ते प्रयत्न करतात. त्या व्यतिरिक्त कुटुंबांना एकमेकांची भेट घेता येत नाहीये.

18 कुटुंब
सध्या ही लोकं हिमाचल प्रदेश मध्ये विविध ठिकाणी स्थित आहेत. तिथून एकूण 18 कुटुंब जळगावत येतात आणि गरम कपडे विकतात.इतर वेळी हे सर्व हिमाचल प्रदेश मध्ये आणि आजूबाजूच्या भागांमध्ये मक्याची शेती करतात. आणि हिवाळ्यामध्ये भारतात विविध ठिकाणी जाऊन गरम कपडे विकतात ज्यात जळगावचा ही समावेश आहे जळगाव मध्ये एकूण 18 कुटुंब आली आहेत.

यावेळी जळगाव लाईव्हशी बोलताना तिबेटियन फेअरच्या मुख्य प्रतिनिधी कुसंग संगमो यांनी सांगितले की जळगावकरांनी मोठ्या प्रमाणावर येऊन गरम कपडे विकत घ्यावेत. याचबरोबर त्यांनी जळगावकरांना असे आव्हान केले आहे की, आम्ही फार लांबून तुमच्या सेवेसाठी इथे येतो तुम्ही या सेवेचा लाभ घ्यावा.आणि आमच्याकडचे गरम कपडे विकत घ्यावेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह