लाच भोवली : सहाय्यक सहकार अधिकारी १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

डिसेंबर 9, 2022 5:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२२ । अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच (Bribe) घेताना जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या आज दुपारी रंगेहात अटक केली. शशीकांत नारायण साळवे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली. या अटक करण्यात

bribe jpg webp

अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयात शशीकांत रायण साळवे यांना दहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ न देता अपीलात मदत करण्यासाठी दहा हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

या अनुषंगांने संबंधीत तक्रारदाराने याबाबतल लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात शशिकांत नारायण साळवे या कर्मचार्‍याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now