राज्य नाट्य स्पर्धेची घंटा वाजली : २४ नोव्हेंबरपासून नाटकांना शुभारंभ
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२२-२३ ची प्राथमिक फेरी जळगाव केंद्रावर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्पर्धा २४ नोव्हेंबरपासून छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. स्पर्धेत १३ नाटकांचा समावेश आहे.
समन्वयक नियुक्त होत नसल्याने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होणे बाकी होते. जळगाव केंद्रावर १५ संघांनी आपल्या नाटकाची प्रवेशिका समन्वयकपदी कला दिग्दर्शक भूषण वले यांची नियुक्ती झाल्यानंतर मंगळवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे. दाखल प्रवेशिकांपैकी दोन संस्थांनी माघार घेतली त्यामुळे स्पर्धेत १३ नाटकांचा समावेश आहे
वेळा पत्र
२४ नोव्हेंबर : सुबोध बहुउद्देशीय युवा विकास प्रतिष्ठान जळगाव: अजूनही चांदरात आहे
२५ नोव्हेंबर : संजीवनी फाउंडे, जळगाव : जुगाड
२६ नोव्हेंबर : समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडे : आर्यमा उवाच
२७ नोव्हेंबर: एम. जे. कॉलेज (स्वायत्त), जळगाव : मडवॉक
२८ नोव्हेंबर : मध्य प्रदेश मराठी अकादमी, इंदौर : सुखांशी भांडतो आम्ही
२९ नोव्हेंबर : सार्थक सांस्कृतिक कला संस्था, इंदौर : अशुद्ध बीजापोटी
२ डिसेंबर : कै. शंकररावजी काळुंखे चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव : मुसक्या
३ डिसेंबर : इंदाई फाउंडेशन, बंदरखे (पाचोरा) : राशोमान
४ डिसेंबर : ज्ञानसागर ग्रंथालय, राखुंडे नगर, चाळीसगाव : काय डेंजर वारा सुटलाय
५ डिसेंबर : कलरबोच मल्टीपर्पज फाउंडेशन, जळगाव : एक रोज
६ डिसेंबर : भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर : वेडात म्हातारे वेगात दौडले तीन
७ डिसेंबर : अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगाव: पुन्हा सलवा जुडूम