⁠ 
सोमवार, मे 6, 2024

भोपाळमधील नॉन इंटरलॉकिंग कामामुळे भुसावळमार्गे धावणाऱ्या 11 रेल्वे गाड्या रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२३ । रेल्वे प्रशासनाकडून विविध विभागात नॉन इंटरलॉकिंगचे कामे केली जात असून यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अशातच आता भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकांदरम्यान तिसरी लाइन सुरू करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या अकरा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर चार गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात (डायर्व्हजन) आला, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

रद्द झालेल्या गाड्या अशा
१२१५३ लोकमान्य टिळक टर्मिनस- राणी कमलापती एक्स्प्रेस ही २६ ऑक्टोबरला, तर १२१५४ राणी कमलापती- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २७ ऑक्टोबरला रद्द करण्यात आली. १२७२० हैदराबाद- जयपूर एक्स्प्रेस १६ ते २५ ऑक्टोबरदरम्यान, तर १२७१९ जयपूर- हैदराबाद एक्स्प्रेस १८ ते २७ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस- हरिद्वार एक्स्प्रेस १६ ते २६ ऑक्टोबरदरम्यान, तर १२१७२ हरिद्वार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १७ ते २७ ऑक्टोबरदरम्यान रद्द करण्यात आली. १२४०५ भुसावळ- हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत, तर १२४०६ हजरत निजामुद्दीन- भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस १३ ते २२ ऑक्टोबरदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

१९४८३ अहमदाबाद- बरौनी एक्स्प्रेस १५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत, तर १९४८४ बरौनी- अहमदाबाद एक्स्प्रेस १५ ते २७ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली. १९४३५ अहमदाबाद- आसनसोल एक्स्प्रेस २६ ऑक्टोबरला रद्द आहे.

मार्गात बदल झालेल्या गाड्या अशा
इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे गाड्यांचे परिवर्तन ः ११०७१ लोकमान्य टिळक टर्मिनस- वाराणसी कामायनी एक्स्प्रेस १५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान, ११४०७ पुणे- लखनौ एक्स्प्रेस १७ ते २४ ऑक्टोबरदरम्यान, २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्स्प्रेस २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान, १२९४३ बलसाड- कानपूर एक्स्प्रेस २५ ऑक्टोबरला परावर्तीत मार्गाने जाईल.

कटनी, जबलपूर, इटारसीमार्गे वळविलेल्या गाड्या अशा ः ११०७२ वाराणसी- लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस १५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान, ११४०८ लखनौ- पुणे एक्स्प्रेस १९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान, २२५३७ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २४ ते २७ ऑक्टोबरदरम्यान, १२९४४ कानपूर- बलसाड एक्स्प्रेस २७ ऑक्टोबरला परावर्तीत मार्गाने जाईल.