‘मेगा ब्लॉक’मुळे कित्येक रेल्वेगाड्या रद्द : जाणून घ्या गाड्यांची आरक्षण स्थिती

नोव्हेंबर 12, 2022 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । मध्य रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पर्यायी अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेणे अतिशय गरजेचे आहे.

train

मध्य रेल्वेच्या मार्गावर असणार्‍या मुंबईतील कर्नाक रोड ओव्हर ब्रिज काढण्यासाठी २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे. या अंतर्गत कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करणार आहे. यामुळे अप आणि डाउन धिम्या मार्गावर १९ नोव्हेंबरला रात्री ११ पासून ते २० नोव्हेंबरला ५ वाजेपर्यंत १७ तासांचा ब्लॉक असेल.

यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने भुसावळ ते अकोला मार्गावरील गोंदिया, महाराष्ट्र, गितांजली, नागपूर दुरंतो, अमरावती एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत. यात २० नोव्हेंबर रोजी : मुंबई – अमरावती एक्स्प्रेस; मुंबई – हावडा एक्स्प्रेस; मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस; मुंबई – हावडा दुरांतो एक्स्प्रेस; मुंबई – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस; मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now