खान्देश कन्या महिला मंडळाचा अभिनव उपक्रम ; पक्षांसाठी मातीच्या भांड्यात पाणी व अन्न

मे 4, 2021 10:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । सध्या उन्हामुळे जीवाची लाही लाही होत असून तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यन्त पोहचले आहे. अन्न पाण्यावाचून अनेक पक्षी तडफडताना दिसत आहे. त्यांच्यासाठी दानापाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सुजाण नागरिक पुढे सरसावले आहेत. 

jalgaon

लांडोर खोरी उद्यान जवळील रायसोनीनगर परिसरातील रहिवासी तसेच खान्देशकन्या महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी यांनी पुढाकार घेऊन कॉलनी परिसरात अनेक महिलांना सोबत घेऊन पक्षांना गार पाणी मिळावे म्हणून मातीच्या (बडगी) भांड्यात पाणी आणि धान्याची व्यवस्था करीत आहेत. या स्पृहणीय कार्याचे अनेकांकडून कौतुक होत आहे. त्यांनी पाण्यासाठी व अन्नासाठी भांडी घेऊन जबाबदारीने ते कार्य करीत आहेत.

मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी थंड राहते .पर्यावरण जागृती, पर्यावरणाचे संतुलन राहावे आणि जंगलातील जीवजंतूंना आधार मिळावा म्हणून हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मंगलाबाई बारी व पर्यावरण आणि जलमित्र तुषार वाघुळदे यांनी सांगितले.

‘मॉर्निंग वॉक’ ला जात असताना एक पक्षी मृत अवस्थेत दिसला, आणि विचार मनात आला. कॉलनीतील महिलांना एकत्र करून ही मोहीम राबविण्याचे ठरविले , असेही त्या म्हणाल्या. अन्न पाण्यावाचून अनेक पक्षांचा तडफडून मृत्यू होताना दिसत आहे. पक्षांना जीवदान कसे मिळेल यासाठी आमची धडपड सुरू झाली आहे.

नागरिकांनी, पर्यावरण प्रेमींनी रखरखते ऊन लक्षात घेता ” पक्षी वाचवा ” असे अभियान स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन राबवावे आणि त्यांचा जीव वाचवावा तसेच तहानलेल्या पक्षांची तृष्णा भागवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या महत्वपूर्ण अभियानात सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी, पर्यावरण प्रेमी तुषार वाघुळदे, सोनाली चौधरी, सुषमा भावसार, वंदना पाटील, वंदना बारी, सोनल कपोते, पूनम बारी, टीना बारी आदींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now