खडसेंसोबत जाणार नाही: त्यांना सोबत घेणार नाही – आ. मंगेश चौव्हाण
जळगाव लाईव्ह न्यूज | ११ नोव्हेंबर २०२२ | जिल्हा दूध संघात एकनाथ खडसे यांच्या सोबत पॅनल तयार करण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते तयार नाहीत. त्यामुळे खडसे एकाकी पडल्याने पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीचे पॅनल तयार करण्याचा आव आणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गौप्य स्फोट भाजपचे आमदार मंगेश आहे. मंगेश चव्हाण यांनी केला आहे. खडसेंसोबत केवळ राष्ट्रवादीचे नेतेच नाही, तर लाय डिटेक्टर टेस्ट केली तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक नसल्याचे आढळून येईल, असेही चव्हाण म्हणाले.
मंगेश चव्हाण यांनी गुरुवारी जिल्हा दूध संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सात वर्षामध्ये खडसेंनी सरंजामशाही पद्धतीने दूध संघात कामकाज पाहिजे. गेल्या २५-३० वर्षांत खडसेंनी अनेक गैरप्रकार केले. खोटे बोल मात्र रेटून बोल अशा पद्धतीने खडसे वागले. अशांच्या विरोधात आमचा लढा आहे असे आ. चौव्हाण म्हणाले.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. सर्वपक्षीय पॅनलसाठी आमचीही तयारी आहे. मात्र, भाजप कोणत्याही परिस्थितीत खडसेंसोबत जाणार नाही. त्यांना आम्ही सोबत घेणार नाही, अशी भूमिका मंगेश चव्हाण यांनी यावेळी जाहीर केली. आमच्या नेत्यांचे बोलणे सुरू असून, राष्ट्रवादीचे नेतेदेखील संपर्कात आहेत. त्यामुळे माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल, असेही मंगेश चव्हाण यांनी सांगितले.