⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | बातम्या | लोकसभेच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात बदल ; पहा प्रति लिटरचा दर?

लोकसभेच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात बदल ; पहा प्रति लिटरचा दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । मंगळवारी देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून निकालानंतर दुसऱ्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. जर तुम्ही तुमच्यावाहनामध्ये पेट्रोल पंपावर जाल तेव्हा तुम्ही नवीनतम दर निश्चितपणे पहा.

देशातील सरकारी तेल कंपन्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इंधनाच्या दरात २ रुपयांची कपात केली होती. साहजिकच देशातील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले होते. कारण वेगवेगळ्या टॅक्स स्लॅबमुळे सर्व राज्यांमध्ये तेलाचे दर वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर काय आहेत हे सांगणार आहोत.

देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत?
-दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 94.76 रुपये आणि डिझेलचा दर 87.66 रुपये प्रति लिटर आहे.
-मुंबईत पेट्रोल 104.19 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.13 रुपये प्रति लिटर आहे.
-कोलकात्यात पेट्रोल 103.93 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.74 रुपये प्रति लिटर आहे.
-चेन्नईमध्ये पेट्रोल 100.73 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर आहे.
-बेंगळुरूमध्ये पेट्रोल 99.82 रुपये आणि डिझेल 85.92 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत

-नोएडामध्ये पेट्रोल 94.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.94 रुपये प्रति लिटर आहे.
-गुरुग्राममध्ये पेट्रोल 95.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 88.03 रुपये प्रति लिटर आहे.
-पटनामध्ये पेट्रोल 105.16 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.03 रुपये प्रति लिटर आहे.
-लखनऊमध्ये पेट्रोल 94.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.74 रुपये प्रति लिटर आहे.
-चंदीगडमध्ये पेट्रोल 94.22 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 82.38 रुपये प्रति लिटर आहे.
-हैदराबादमध्ये पेट्रोल 107.39 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.63 रुपये प्रति लिटर आहे.

  • जयपूरमध्ये पेट्रोल 104.86 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.34 रुपये प्रति लिटर आहे.
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.