लिंगायत कोष्टी समाजातर्फे भुसावळला वधू-वर परिचय मेळावा
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । लिंगायत कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे तृतीय राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार, 13 नोव्हेंबर रोजी लोणारी समाज मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता होत आहे. अध्यक्षस्थानी जलसंधारणाचे शाखा अभियंता प्रसादकुमार काटे असतील. उद्घाटन माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, अमोल इंगळे, डॉ.अशोक सिनगारे, घाटकोपर येथील वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय डहाके, डॉ.नंदकुमार वसवाडे, प्रा.शीतल वाहढरे, पौर्णिमा कानडे, निर्मला गोंदेकर, सीमा कोलते आदी उपस्थित राहणार आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी नाव नोंदणीसाठी वधू-वरांनी, पालकांनी येतांना सोबत दोन पासपोर्ट फोटो आणावे, परीचय पत्रक आणावे, मेळाव्यासाठी तालुका स्तरीय समिती नियुक्त केली असल्याचे अध्यक्ष मुकेश कोष्टी यांनी कळविले आहे.