भुसावळातील आनंद लॉजवर पोलिसांचा छापा, पाच महिलांसह पुरुषांना घेतले ताब्यात

मार्च 21, 2022 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२२ । भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीजमधील आनंद लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह पुरुषांना ताब्यात घेतले आहे. या लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय चालताे अशी गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी (police) येथे धडक कारवाई केली. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

raid

काय आहे प्रकार?

भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजमधील आनंद लॉजमध्ये पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने आज सोमवार, 21 रोजी दुपारी अचानक छापा मारला. यात पाच वेश्यांसह पाच पुरुषांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांना हॉटेलमध्ये अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस पथकाने छापा टाकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अनैतिक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे (Dysp Somnath Waghchure) यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now