⁠ 
शनिवार, जून 15, 2024

Bhusawal : पालिका कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे भुसावळकरांना गाळयुक्त पाण्याचा पुरवठा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२३ । गेल्या काही दिवसापासून भुसावळ शहराला गाळमिश्रीत पाणीपुरवठा झाला त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रात जाऊन हा काय प्रकार आहे याची माहिती संकलन केली. माहिती घेताना पाणी पुरवठा केंद्रातील काम किती भोंगळ कारभाराचे दर्शन झाले.

पाणीपुरवठा शुद्ध व्हावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असताना पालिकेचे कर्मचारी मात्र निष्क्रियता दाखवून मोगरी लावण्याचा प्रयत्न करताय असे निदर्शास आले आहे. पाणी गाळप झाल्यानंतर त्यातील गाळ मिश्रित पाणी हे पाईप लाईन द्वारे थेट नदीत सोडले जाते. त्यासाठी चेंबर ही बनविले गेले आहेत त्यापैकी एक चेंबर तुटलेल्या अवस्थेत होते. त्या चेंबरमध्ये रॅबिट पडले आणि ती पाईप लाईन चोक अप झाली.

त्यातील रॅबिट त्वरीत काढणे अपेक्षित असताना ते कितीतरी दिवस काढले नाही परिणामी तो गाळ मागे येत परत पालिकेतील विहिरीत आला. तसेच गाळ वाहून नेणारी गटार गेल्या कित्येक वर्षापासून साफ नाही. परिणामी ते पाणी बाजूच्या एका घरात घुसले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तो पाणी उपसा बंद केला आणि तो गाळ थेट शुध्द पाण्यात मिसळला गेला व अशुद्ध, गाळ मिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला.

हे अशुद्ध पाणी थेट नागरिकांना मिळाल्याने संतापाची लाट तयार झाली. ह्या तांत्रिक अडचांनीची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी यांना भाजप नगरसेवकांनी दिली व पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली. प्रसंगी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, प्रा.दिनेश राठी, पिंटू ठाकूर, सतीश सपकाळे, निक्की बतरा, अजय नागराणी, मुकेश पाटील, बापू महाजन, प्रा.धिरज पाटील, गौरव लोणारी, रुपेश देशमुख, युवा मोर्चाचे भाग्येश चौधरी, अमोल पाटील, कैलास पाटील, आकाश राजपूत व कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नागरिक वेठीस

खरेतर रॅबिट काढणे, गटार साफ करणे या छोट्या बाबींकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने शहराला वेठीस धरले. साडे पाच कोटी खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र अद्यावत करण्याचा प्रयत्न सुरू असताना अशी निष्क्रियता अपेक्षित नाही. आता पुनश्च या कामासाठी तीन कोटी रुपये निधी मागणी आमदार संजय भाऊ सावकारे यांनी केली आहे. यापूर्वीचा निधी ही आमदार सावकारे यांनीच उपलब्ध करून दिलेला आहे. पाणी पुरवठा करताना दर तासाने पाण्याचा नमुना घ्यावा लागतो त्याची नोंद करावी लागते ते ही सपशेल बंद आहे. अश्या भोंगळ कारभारने शहराला शुध्द पाणी मिळेलच कसे? आता त्यात सुधारणा झाली नाहीतर त्यास जबाबदार असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रस्त्यात पकडल्या शिवाय राहणार नाही अशी माहिती युवराज लोणारी यांनी दिली आहे.