जळगाव शहरातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

नोव्हेंबर 5, 2022 6:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 1 1 jpg webp

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात 17 वर्षे मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता अज्ञात व्यक्तीने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु मुलगी कुठेही आढळून आली नाही.

अखेरीस त्यांनी सायंकाळी 7 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now