जळगाव जिल्हा

निर्दयी चोरटे : साडेआठ लाखांच्या कापसासह मका लांबवला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । धरणगाव शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांच्या कमल जिनिंगमधून चोरट्यांनी शनिवारी रात्री जिनिंगची बाजूची भिंत फोडत चोरट्यांनी भिंतीच्या बोगद्यातून साधारण 35 ते 40 क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका मिळून लांबवल्याने जिनिंग मालकाला साडेआठ लाखांचा फटका बसला आहे.

भिंत फोडून केली चोरी
शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनिंग असून चोरट्यांनी शनिवार रात्री जिनिंगची बाजूची भिंत फोडत आत प्रवेश केला. त्यानंतर फोडलेल्या भिंतीच्या बोगद्यातून साधारण 35 ते 40 क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका चोरून नेला.

साडेबारा लाखांच्या कपाशीसह मका लांबवला
कपाशीला आठ हजार रुपये भाव असल्यामुळे तिची किंमत साधारण चार लाखांच्या घरात आहे तर मका 50 हजार रुपये असा साधारण साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी चार चाकी वाहनाच्या चाकांचे मार्क दिसल्याने चोरट्यांनी वाहनातून माल लांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळी नेहमी प्रमाणे मजूर कामावर आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अमोल गुंजाळ आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झालेत.

Related Articles

Back to top button