जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यातच पत्नी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या असताना चोरट्यांनी भरदिवसा खिडकीचे ग्रील कापून रोख एक लाख ५० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात आठ तोळे सोने आहे.
रिंगरोड परिसरातील लोकमान्य हौसिंग सोसायटी परिसरात राहणारे कांतीलाल कटारिया हे गुरू महाराजांच्या दर्शनासाठी चेन्नई येथे गेले आहेत, तर त्यांच्या पत्नी शशिकला कांतीलाल कटारिया (६४) या सकाळी साडेसात वाजता धार्मिक कार्यक्रमासाठी गणपतीनगरात गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख एक लाख ५० हजार रुपयांसह ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलस, ३० ग्रॅम सोन्याच्या पाटल्या, १० ग्रॅमचे कर्णफुले, १० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, २०० ग्रॅमचा चांदीचा गणपती, ३०० ग्रॅम चांदीचे साखळ्यांचे जोड, ३५० ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के असा एकूण तीन लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सर्व खोल्यांमधील कपाट उघडे
गणपतीनगरातून शशिकला कटारिया या घरी परतल्या त्यावेळी त्यांना बेडरूमधील दिवे सुरु दिसले. त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते, तसेच पाठीमागे असलेल्या खिडकीचे ग्रील तुटलेले होते. चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली असता दुसऱ्या बेडरूममधील व हॉलमधील कपाटदेखील उघडे दिसले