⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेसाठी डॉ.अभिषेक पाटील व आकाश धनगर यांची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२२ । जम्मू काश्मीर, गुलमर्ग येथे १५ ते १७ जानेवारी २०२२ होत असलेल्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेसाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले चाळीसगांवचे रहिवासी डॉ.अभिषेक पाटील व आकाश धनगर यांची आठव्या राष्ट्रीय आईस स्टॉक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

आईस स्टॉक विंटर खेळाला इंटरनॅशनल ऑलिम्पिकची मान्यताप्राप्त आहे. युवा व खेल मंत्रालयच्या ‘खेलो इंडिया’ साठीही आईस स्टॉक खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना जळगांव जिल्हा आईस स्टॉक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.राहूल वाकलकर, प्रतीक शुक्ला, अनिल बाविस्कर, स्वप्निल जाधव, राहुल पाटील,उमेश हंडे, दीपक निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्रात आईस स्टॉक विंटर खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अविरतपणे कार्यरत असणारे महाराष्ट्र आईस स्टॉक असोसिएशन अध्यक्ष महेश राठोड, राज्यउपाध्यक्ष अ‍ॅड.राहूल वाकलकर व महासचिव अजय सर्वोदय यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.

हे देखील वाचा :