जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे रेल्वे प्रशासनाने आगामी सणासुदीला प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन जालना ते छपरा दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीला आज 26 ऑक्टोबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे जालना रेल्वे स्थानकावरुन या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.
विशेष म्हणजे ही गाडी भुसावळमार्गे धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 07651/ 07652 – जालना-छपरा-जालना विशेष रेल्वे जालना येथून दर बुधवारी रात्री 09:30 ला सुटेल तर शुक्रवारी सकाळी 5:30 ला छपरा येथे पोहोचेल. तसंच परतीच्या प्रवासात ही गाडी छपरा येथून दर शुक्रवारी रात्री 10:15 ला सुटून औरंगाबाद येथे रविवारी 1 वाजता तर जालना येथे सकाळी 4 वाजता पोहोचेल. जालना – छपरा ही गाडी 02 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत धावेल. तसेच परतीच्या प्रवासात छपरा-जालना ही गडी 28 ऑक्टोबर 2022 ते 25 नोव्हेंबर 2022 दर शुक्रवारी धावेल
या स्थानकांवर असेल थांबा?
जालना येथून ही गाडी रात्री 9:30 ला सुटल्यानंतर ती औरंगाबादहून 00:20 वाजता, मनमाड ज. 04:20 वाजता, भुसावळ 06:40 वाजता, खांडवा 08:55 वाजता, हरदा 10:02 वाजता, इटारसी जंक्शन 12:10 वाजता सुटेल. पिपरिया येथून 1:02 वाजता, गडवार 13:27 वाजता, नरसिंगपूर 14:00 वाजता, जबलपूर 3:40 वाजता, कटनी 5:00 वाजता, मैहर 5:42 वाजता, सतना 18:25 वाजता, माणिकपूर 20:10 वाजता, प्रयागराज जंक्शन 10:40 वाजता, ग्यानपूर रोड 11:50 वाजता, तिसऱ्या दिवशी बनारस येथून 00:55 वाजता, वाराणसी 01:20 वाजता, औरिहर 02:02 वाजता, गाझीपूर शहर 02:05 वाजता. ती बलिया येथून 03:45 वाजता आणि सहटवार 04:05 वाजता सुटेल आणि 05:30 वाजता छपरा येथे पोहोचेल.