धक्कादायक! चोपडा तालुक्यात २५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग

ऑक्टोबर 25, 2022 4:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । चोपडा तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहितेचा दारूच्या नशेत असणाऱ्या एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 3 jpg webp

तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह घरात असताना दि. २३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शिकारी मालज्या पावरा हा दारूच्या नशेत लाकडी दांडा घेवून घरातील मागच्या दाराने येत महिलेच्या पतीच्या अंगावर धावून आला. यानंतर पती घराबाहेर जाताच, संशयित आरोपीने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिकारी मालज्या पावरा याच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.देविदास ईशी हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now