सुकळीत दोन ठिकाणी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

ऑक्टोबर 24, 2022 1:04 PM

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तालुक्यात भुरट्या चोरांनी धुमाकुळ घातला असुन शेतातील कृषी पंपाच्या केबल्स् चोरी जात असल्याच्या घटना वारंवार घडताहेत. तालुक्यातील सुकळी-दुई परीसरात केबल चोरांना बळीराजा पुरता वैतागला असताना, सुकळी येथील मुख्य चौकातील दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.

crime theft jpg webp


दि. २२ च्या मध्यरात्री सुकळी येथील विजय देविदास पाटील यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करत ४३००० रू.चा इंच एल ई डी टिव्ही,डिश रीसीव्हर व सॅमसंग कंपनीचा मोबाईल लांबविला.तसेच धोंडु कडु पाटील यांच्या घरातील विवो कंपनीचा मोबाईल फोन व आठ हजार रुपये असा एकुण ६० हजाराचा ऐवज घेऊन पोबारा केला. आधीच केबल्स चोरांना वैतागलेल्या शेतकरी बांधवांना ऐन दिवाळीत भुरट्या चोरांनी सळो कि पळो करुन सोडले असतांना पोलीस प्रशासनाकडुन या चोरांबाबत कोणताही तपास लागत नसल्याने परीसरातुन तीव्र नाराजी व्यक्त होतांना दिसुन येत आहे. ऐन दिवाळीत परीसरात असंख्य शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीचा सपाटा चालु असतांना थेट गावापर्यत मजल मारणाऱ्या चोरांनी जणु पोलीस प्रशासनाला कडकडीत समालच ठोकला असुन चोरांना पकडण्याचे आव्हान पोलीसांपुढे आहे. मात्र पोलीस तपासकार्य शुन्य असुन परीसरातील शेतकरी बांधवासह जनता त्रस्त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now