⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | नपाने तरी आपली कामगिरी बजवावी

नपाने तरी आपली कामगिरी बजवावी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । अमळनेर शहरातील प्लॉटधारक व मालक यांना नगरपालिकेने गेल्या काही महिन्यांपूर्वी जाहीर सुचनेव्दारे कळविले होते की, नपा क्षेत्रात ज्या प्लॉटधारकाचे प्लॉट रिकामे पडलेले आहेत. त्या प्लॉट मध्ये काटेरी झाडे झुडपे, वाढलेले गवत, पाण्याचे डबके यामुळे डास, मच्छर, सरपटणारे प्राणी व त्यांची उत्पती स्थाने निर्माण होऊन आजुबाजूच्या परिसरातील नागरीकांस त्याचा उपद्रव होत आहे.

अश्या प्लॉटधारकांनी आपल्या मालकीचा रिकामा प्लॉट सि.स.न. मधील सदर कामाचे व्यवस्थित साफ सफाई करून घ्यावी, अन्यथा नगरपरिषदे मार्फत जेसीबी वापरून किंवा मनुष्यबळ वापरुन साफ सफाई केली जाईल व त्याचा होणारा खर्च प्लॉट धारकाकडून रोख स्वरुपात आकारण्यात येईल. सदरचा खर्च रोखीने न भरल्यास संपुर्ण रक्कम आपल्या मालमत्ता करात आकारण्यात येवून वसुल करण्यात येईल.असे अमळनेर नगरपालिकेकडून संबंधित प्लॉट धारकांना सुचविले होते तरी बऱ्याच भागात अजून ना प्लॉट धारक काढत आहेत ना नगरपालिका कारवाई करत आहे.

परिणामी आजूबाजूच्या रहिवाशांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनुसया पेट्रोलपपंच्या मागच्या साईडला असलेल्या साईप्रसाद नगर,दौलतनगर ,येथे तर प्रचंड झाडेझुडपे वाढलेली आहेत. तशीच परिस्थिती रवी नगर ,तांबेपुरा भागात दिसते तरी नगरपालिका प्रशासनाने आपले कर्तव्य बजवत याकडे लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह