दिवाळीपूर्वी ग्राहकांना झटका ; सोने-चांदीच्या किमतीत आज झाला ‘हा’ बदल, त्वरित तपासा नवे दर

ऑक्टोबर 20, 2022 10:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ ।येत्या काही दिवसांमध्ये दिवाळी येत आहे. अशातच सोने-चांदी (Gold-Silver Price) खरेदी करण्याचा कल देखील वाढला आहे. मात्र मागील काही सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीच्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज व्यवहाराच्या चौथ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून आलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेनंतर सोन्याच्या भावात किंचित 93 रुपयाची वाढ दिसून आलीय. तर चांदी 92 रुपयांनी महागली. दरम्यान, दिवाळी आणि धनत्रयोदशी जवळ आली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने घसरण दिसून आलीय. Gold Silver Price Today

gold rate (2)

MCX वर आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
आज गुरुवारी, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत प्रति 10 ग्रॅम सोने 93 रुपयांनी घसरले. त्यामुळे सोने 50,292 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे सुरुवातीच्या व्यवहारात आज चांदीच्या किमतीत किंचित वाढ दिसून आली. सकाळी 10.30 वाजेपर्यंत चांदी 92 रुपयांनी घसरून 56,106 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,500 रुपयांपर्यंत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,800 रुपये इतका आहे. दरम्यान, दुसरीकडे सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 57,200 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना रहा सावध
दरम्यान, दिवाळी आता अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशात मोठ्या प्रमाणात सोने-चांदी (Gold-Silver) खरेदीसाठी सराफा बाजारात खरेदीची झुबंड उडणार आहे. अशावेळी तु्म्ही सावध नसाल तर तुमची सोने खरेदीत फसवणूक होऊ शकते.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now