“शावैम” मधील उपचारपद्धती चांगली : महापौर जयश्री महाजन

एप्रिल 29, 2021 9:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना दिली जाणारी उपचार पद्धती खूप  चांगली आहे. येथील कोविडबाधित रुग्णांसाठी व्यवस्थापन उत्तम दिसत असल्याचे प्रतिपादन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी केले.

mayor jayashree mahajan called on dr

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दि.२९  रोजी सकाळी महापौर जयश्री महाजन यांनी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद व शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांची भेट घेतली.

प्रसंगी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापन कसे चालते याची माहिती घेतली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वॉर्डांची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी रुग्ण प्रवेश प्रक्रिया, त्यांना दिली जाणारी वैद्यकीय व रुग्णालयीन सेवा, भोजन सेवेची माहिती दिली. भोजन कक्षासाठी  आहारतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती कार्यरत आहे. जीएमसीच्या उत्तम सेवेमुळे गरीब लोकांना आर्थिक झळ बसत नाही. केवळ अत्यवस्थ व गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल असतात, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मालकर उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now