मोठी बातमी : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतुन भाजपची माघार
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे.. अशी घोषणा भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित म्हटला जात आहे
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. राज ठाकरे यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील निवडणूक बिनविरोध करा अशी मागणी केली होती. आता हि निवणूक बिनविरोध होईल का ? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.