⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Big Breaking : शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्याची परवानगी दोन्ही गटांना नाकारली

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । मुंबई महानगर पालिकेने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेत हि परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आल्याचं पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

आधीक माहिती अशी कि, कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता हि परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता शिवसेनेनं उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दोन्ही परस्परविरोधी अर्जदारांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले. मात्र, कोणत्याही एका अर्जदाराला त्यासाठी परवानगी दिल्यास त्यातून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो असं स्पष्टीकरण परवानगी नाकारताना प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

image 19
Big Breaking : शिवाजी पार्कवर दसऱ्या मेळाव्याची परवानगी दोन्ही गटांना नाकारली 1