सावदाद्यात गजानन ठोसरे यांच्याकडून विविध देवस्थानात सीमेंट बाकडे भेट

ऑक्टोबर 16, 2022 4:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । सावदा येथे नेहमी विविध समाज उपयोगी कामात अग्रेसर असलेले गजानन नामदेव ठोसरे यांनी पुन्हा एकदा समाज उपयोगी कार्य म्हणून शहरातील विविध सर्वधर्मीय देवस्थान येथे सिमेंट चे बाकडे भेट दिले. आगामी काळात आणखीन विविध समाज उपयोगी कार्य देखील राबविणार असल्याचे ठोसरे यांनी यावेळी सांगितले.

jalgaon 2022 10 16T165227.107


सावदा शहरातील धार्मिक ठिकाण असलेल्या ठिकाणी हे बेंच त्यांचे स्वर्गवासी भाऊ सचिन नामदेव ठोसरे यांचे स्मरणार्थ त्यांनी हे बेंच भेट दिले. यात सावदा येथील क्रांती चौकातील गणपती मंदीर, सितला माता मंदिरे, शनी मंदीर, इंगळे वाडा मुंजोबा मंदीर, पनापीर बाबा दर्गाह, जमादार मोहल्ला दर्गाह, गवत बाजार महादेव मंदीर, गांधी चौक मारोती मंदीर यासह विविध ठिकाणी हे बेंच भेट देण्यात आले. यावेळी गजानन ठोसरे यांचेसह मधुकर चौधरी, प्रदीप भंगाळे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now