जळगाव शहर

‘वाचन करु या’  समृद्ध होऊया…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जात आहे. त्यानुषंगाने ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका  प्रणिता झांबरे यांच्या हस्तेभारताचे माजी  राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. डॉ. सँम्युअल जाँन्सन इंग्रजी भाषा शब्द कोशकार यांची माहिती  लेखातून वाचन करण्यात आली.
 

ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची जडण घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषा विकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे.या अनुषंगाने विद्यालयात विद्यार्थ्यांकडून विविध लेखकांनी लीहलेल्या पुस्तकातील उतारा वाचन करण्यात आले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेत असणारे विविध वर्तमान पत्रातील बातम्या चे वाचन करण्यात आले. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो.  विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड, ओढ व प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्त्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने दिवाळीच्या सुट्टीत प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचावे आणि पुस्तक समीक्षण करून त्यावर त्यांचे मनोगत लीहून  द्यावे असा संकल्प करण्यात आला.

प्रसंगी पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, गुरूवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, डी.ए.पाटील ,ए.एन पाटील, धिरज चौधरी, पराग राणे,पुनम कोल्हे,प्रतिभा लोहार आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तायडे, चंदन खरे, अनिल शिवदे ,तुषार सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button