⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

जळगाव महापालिकेवर प्रशासकीय राज; आयुक्तांच्या हाती कारभार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ सप्टेंबर २०२३ | जळगाव महापालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत रविवारी (ता. १७) पूर्ण होत आहे. निवडणुका घेणे शक्य नसल्याने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. गायकवाड या प्रशासकपदाचा पदभार सोमवार (ता. १८) पासून घेतील.

नगरविकास विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुळकर्णी छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका विहित वेळत घेणे शक्य होणार नसल्याचे, तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत आदेशातून कळविले आहे.

कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेची मुदत पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे संबंधित मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार १७ सप्टेंबरला मुदत संपत असलेल्या महापालिकेत प्रशासकपदावर आयुक्तांची नियुक्ती करण्यात येत आहे.