जळगाव जिल्हा

अमृत २ चा नवीन डी पी आर सर्वसमावेशक बनवा – आ. भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरात अमृत २ योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाला पाहिजे असलेल्या प्रस्तावाची मुदत ३० ऑक्टोबर पर्यंत असल्याने त्यावर काय निर्णय घ्यावा,त्यात नवीन संकल्पना काय असाव्या यासाठी गुरुवारी महापौरांच्या दालनात आ सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीत महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील,विरोधी पक्षनेते सुनील महाजन,आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या सह नगरसेवक विशाल त्रिपाठी, नवनाथ दारकुंडे, ऍड दिलीप पोकळे, नितीन बरडे, ऍड शुचिता हाडा, सरिता नेरकर, शहर अभियंता पी एम गिरगावकर, अमृत योजनेचे अभियंता योगेश बोरोले, पाणीपुरवठा अभियंता संजय नेमाडे, चंद्रकांत सोनगिरे व आशुतोष पाटील,अमर जैन उपस्थित होते.

या बैठकीत परिपत्रकानुसार प्रस्ताव बनविण्यात यावा, त्यात नगरसेवक व जैन समूहाने मांडलेल्या सूचनाचाही समावेश करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे काम करेल त्यास मनपाच्या अभियंत्यानीहि सहकार्य करावे असे मत आ भोळेंनी मांडले. तसेच हा सुधारित डी पी आर करण्यासाठी लागणाऱ्या ठरावासाठी लवकरात लवकर महासभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली. तर या ठरवत त्रुटी राहिल्यास ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी शहराचे आ सुरेश भोळे प्रयत्न करतील असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button